पुणे शहर

यशवंतराव चव्हाण विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू ; स्थानिक नगरसेवक रामचंद्र कदम यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात

पुणे : कोथरुडमधील प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर येथे पुणे मनपा यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे मोफत लसीकरण केंद्राचे उदघाट्न स्थानिक नगरसेवक ॲड.रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.(Vaccination center started at Yashwantrao Chavan Vidyalaya)

सदर  मोफत लसीकरण केंद्र नगरसेवक ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी सुरु केल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सदर लसीकरण केंद्रामध्ये दररोज १०० नागरिकांना लस दिली जाते.

या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका कोथरूड क्षेत्रीय उपायुक्त श्री. सचिन दामखेडे, डॉ. सौ. अंजली टिळेकर,  डॉ. पल्लवी, श्री. नरेंद्र परदेशी , श्री. मिलिंद आलाटे, तसेच स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरसेवक कदम म्हणाले, या परिसरातील नागरिकांना कोवीड प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यासाठी लांबच्या केंद्रावर जावे लागत होते. या केंद्रामुळे नागरिकांना परिसरातच लसीकरण करण्यात  येत आहे. या केंद्रावर सध्या दररोज १०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसींचा पुरवठा अधिक झाल्यानंतर हे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

Img 20210522 wa0207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये