पुण्यातील निर्बंध शिथिल होणार – अजित पवार सकारात्मक; हॉटेल्स, दुकानांची वेळ सात पर्यंत ?

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध
लागू करण्यात आले आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट
Positivity rate पाहून पुण्यातील निर्बंध शिथिल करणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. पुणे महापालिकेचा पॉझिटिव्हिटी रेट 3.9 वर आल्याने पुण्यातील निबंध शिथिल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सोमवारी यावर सकारात्मक विचार केला जाईल. असे सांगितले. त्यामुळे पुणेकरांना कोरोनाच्या निर्बंधामधून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(Restrictions in Pune will be relaxed – Ajit Pawar positive; Hotels, shops till seven o’clock?)
पुण्यातील हॉटेल्स आणि दुकानांची वेळ ४ ऐवजी ७
पर्यंत करावी अशा सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.यावर सोमवारी सकारात्मक विचार केला जाईल. आणि त्यानंतर त्याबाबत निर्णय घेता येईल.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना बाहेर पडता येईल का? याबाबतीत विचार सुरु असून त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, अशी माहिती अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
