पुणे शहर

पुण्यातील निर्बंध शिथिल होणार प्रशासन आज निर्णय घेणार !

पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहारातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणी पॉझिटिव्हिटी रेट ही ४ टक्क्याच्या खाली आला असल्याने शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार, ता.२६) प्रशासन निर्णय घेणार आहे.(Restrictions in Pune will be relaxed, the administration will take a decision today!)

गेल्या आठवड्यात चाचण्यांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. त्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी झाली आहे. १९ जुलै ते २५ जुलै या आठवड्यात ५३ हजार ९५३ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ८३२ कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.३९ टक्के इतका कमी झाला. त्यामुळे पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत प्रशासन आज निर्णय घेणार आहे. त्यामध्ये दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

Img 20210724 wa0001

ऑगस्टअखेर तिसरी लाट येण्याचा धोका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी निष्काळजी न होता घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे आणि तिसरी लाट येण्यापासून रोखण्यास शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्कयांच्याही खाली गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये