पुणे शहर

कुत्रा भुंकला म्हणून चौघा जणांनी केली तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

पुणे : तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी या तरुणीला बेदम मारहाण करुन जखमी केले. कोथरुड पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी यांनी हा प्रकार घडला तेव्हा कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.(As the dog barked, four men beat the young woman ; Incidents in Kothrud)

राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय ४०, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत.

IMG 20210724 WA0001

फिर्यादी यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी रात्री पावणे अकरा च्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन डाव्या हाताची करंगळी पकडून जाेरात वाकवून त्यांना जबर दुखापत केली. त्यामुळे फिर्यादींचे शारिरीक व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये