पुणे शहर

सायलेन्सरमधून फटाक्याचे आवाज काढणाऱ्या बुलेट चालविणाऱ्यांवर कारवाई

पुणे : सायलेन्सरमधून फटाक्याचे आवाज काढत बेफाम होऊन बुलेट चालविणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे. सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. अशा बुलेट चालकांवर आता गुन्हा दाखल करण्यात येत आहे. वाहन जप्ती आणि लायसेन्स रद्द करण्याच्या दृष्टीनेही पावलं उचलण्यात येत आहेत. 

या सहा महिन्यात वीस हजार बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वीस लाखांचा दंड ही त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे. तरीही सुधारणा न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. तरुणांनी नियमांचं पालन करावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पिंपरी चिंचवड शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिला आहे.

तरुण बुलेटला वेगळा सायलेंसर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनीप्रदुषण होतं. पुण्यात ध्वनी आणि वायू प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये