पुणे शहर

चार चाकी गाडीतून नाही आता दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करा..

पथ विभागाच्या अभियंत्यांसाठी  परिपत्रक जारी ; मनसेच्या मागणीला यश

पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, फुटपाथ, ड्रेनेजच्या समस्या आणि रस्त्यांच्या कामातील त्रुटी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासल्या जाव्यात, यासाठी (मनसे) सातत्याने मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता यांनी मागणी नंतर आता संबंधित, कार्यकारी अभियंते ,कनिष्ठ अभियंते तसेच क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून नियमित क्षेत्र पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मनसेने पुणे महानगरपालिका आयुक्त व शहर अभियंता यांच्या कडे केलेल्या मागणीत, केवळ चारचाकी वातानुकूलित वाहनातून रस्त्यांची पाहणी न करता अधिकारी व अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दुचाकीवरून आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, चौक, जल व मलवाहिन्यांची झाकणे, खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे तसेच इतर पथविषयक समस्या तपासाव्यात, अशी मागणी केली होती.

महापालिकेच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी सकाळच्या सत्रात आपल्या नियंत्रणाखालील कार्यक्षेत्रात स्वतः संबंधित अधिकाऱ्यांसह दुचाकीवरून स्थळ पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

मनसेचा इशारा
“दुचाकीवरून पाहणी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र ही पाहणी केवळ कागदोपत्री किंवा फोटो काढण्यापुरती मर्यादित राहता कामा नये. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यांवरील समस्या पाहून त्यावर वेळेत उपाययोजना केली नाही, तर मनसे पुन्हा महापालिका प्रशासनाला जाब विचारेल.”
पुणेकरांच्या करातून मिळणाऱ्या पैशातून रस्ते तयार होतात. त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि देखभाल याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. “अधिकारी रस्त्यावर उतरले पाहिजेत, ही मनसेची भूमिका पुढेही कायम राहणार आहे,”
प्रशांत कनोजिया
प्रमुख राज्य संघटक,मनविसे
हेल्प रायडर्स(जीव वाचवण्याची एक चळवळ)

Img 20260222 wa00064513382578852640289

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी काढलेल्या
परिपत्रकात काय म्हटले आहे.

सर्व उपायुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त, मुख्य अभियंता यांनी सकाळच्या सत्रात किमान २ तास (सकाळी ९.४५ ते ११.४५) त्यांचे नियंत्रणाखालील कार्यक्षेत्रात स्वतः संबधित अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करून पाहणीचा दैनंदिन
अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त कार्यालयीन आदेशाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका मुख्य खात्यांतगर्त पथ विभाग, परिमंडळे झोन क्र. १ ते ५ व त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवीन रस्ते बनविणे, रस्ते देखभाल व दुरुस्तीची कामे व पूर्ण: डांबरीकरण इ. कामे करणारे सर्व तांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, चौक, जल व मलवाहिन्यांची झाकणे, रस्त्यांवरील व पदपथांवरील खड्डे, रस्त्यांची झिज, अतिक्रमणे तसेच इतर पथविषयक समस्या वेळेत निदर्शनास याव्यात या कारणास्तव चारचाकी ऐवजी दुचाकीवरून स्थळ पाहणी करावी.

तसेच उपरोक्त पाहणी दरम्यान निदर्शनास आलेल्या अस्तित्वातील रस्ता / पदपथावरील रहदारीच्या सुरक्षिततेबाबत, रस्त्याची वाहन चालवण्याची गुणवत्ता (Road Riding Quality) आणि त्याबाबत करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करावा. सदर कार्यप्रणालीप्रमाणे उपरोक्तनुसार संबंधित सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी करावयाची असून सदर कामात कसूर केल्यास संबधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये