पुणे शहर

पुण्यातील “या” भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार…

पुणे : पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा गुरुवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी बंद राहणार असून शुक्रवारी उशिरा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद 

गुरूवार दिनांक २७/०८/२०२६ रोजी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या स्टेज २ पर्वती HLR झोन, भामा आसखेड परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.), चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, पाषाण व सुस गोल टाकी परिसर, चतुःश्रृंगी टाकी परीसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र अंतर्गत येणारा परिसर, वडगाव झोन अंतर्गत राजीव गांधी पंपिंग परिसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील बुधवार रात्री १२:०० पासून गुरुवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये