पुणे शहर

आरटीओमधील रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम लवकरच सुरू होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देवून रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम कामाचा आढावा घेतला. यावेळी हे काम पाच ते सहा आठवड्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधी मधून तीनचाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम साठी  २०१८ साली पन्नास  लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता.

टेस्टिंग करीत रिक्षा चालक आणि अन्य वाहनांना दिवे घाट येथे जावे लागते. हे टेस्टिंग जर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले तर छोट्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. हे लक्ष्यात घेता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज तिथे भेट दिली आणि कामाचा पाठपुरावा केला. ह्या वेळी सार्वजनिक बांधकाम च्या पाटील मॅडम , श्री गुरव , ए. आर. ए. आई  चे श्री भालेराव, श्री दातार आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे श्री शिंदे उपस्थित होते. पाच ते सहा आठवड्यात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे उपस्थित अधिकाऱ्यांनी शिरोळे यांना सांगितले.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये