राष्ट्रीय
समीर वानखेडेंची बदली; केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात नियुक्ती

पुणे : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली असून केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात त्यांची बदली झाली आहे. मुदत संपल्याने त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील. कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता.




