पुणे शहर

सफाई सेवकांना” सफाई मित्र पुरस्कार” प्रदान कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा पुणे शहरातील पहिला अभिनव उपक्रम…..!

पुणे : “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण – २०२५” अन्वये १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिनानिमित्त कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणाऱ्या सफाई सेवकांचा जाहीर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सफाई सेवकांना सफाई मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा अभिनव कृतज्ञता सोहळा पुणे महानगरपालिकेत प्रथमच कोथरूड–बावधन क्षेत्रिय कार्यालयात राबवण्यात आला. 

मुकादम वैजनाथ गायकवाड यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा विचार व्यक्तंकेल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कमिन्स इंडिया लिमिटेड, सेवा सहयोग फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, जनवानी सहकारी संस्था या विविध स्वयंसेवी संस्थांनी हा कार्यक्रम सन्मानाने आयोजित करून शौचालय सफाई कर्मचारी किरण तुसाम, शरद वावळकर, रितेश तुसाम, अथर्व पवार, रणजित कापसे, सचिन भोंडवे सफाई मित्र पुरस्कार तसेच स्वच्छतेचे उपक्रम राबवणारे मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, आरोग्य निरिक्षक करण कुंभार यांना  विशेष पुरस्कार  महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल,  प्रमुख आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, रोटरीच्या अध्यक्षा अश्विनी शिलेदार, कमिन्सचे संपत खैरे, संदीप क्षीरसागर, सेवा सहयोगच्या श्वेता सुर्यवंशी, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष मधुकर नरसिंगे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

Img 20250508 wa00015038950216212096978

या उपक्रमाची संवेदनशील व हृदयस्पर्शी कल्पना मुकादम वैजीनाथ गायकवाड यांनी मांडली होती. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की,“शौचालय साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहसा समाज जवळ करत नाही आणि तुच्छतेची वागणूक दिली जाते त्यांच्याकडे आपलेपणाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे आणि ती समाजाने त्यांच्या प्रति आदराची व प्रेमाची भावनिकता जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमात सफाई सेवकांचा मानचिन्ह, सन्मानपत्र आणि कृतज्ञतेची प्रतीके देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन रोटरीचे माजी उपप्रांतपाल रो. किरण इंगळे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. सदर कार्यक्रम प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर किरण इंगळे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१, यांनी सांगितले की, “सफाई सेवक हे आपल्या शहराच्या स्वच्छतेचे खरे पाया आहेत. त्यांचा सन्मान हा समाजाच्या सजग संस्कृतीचे प्रतीक आहे.” या सोहळ्याने स्वच्छतेबद्दलची जाणीव अधिक दृढ केली असून, पुण्यातील इतर प्रभागांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
             

सदर कार्यक्रम प्रसंगी सेवा सहयोगचे युवराज चाबुकस्वार, मंदार जाधव, हेमंत भराडे, जनवानीचे समीर अजगेकर, हेल्थ इज वेल्थचे डॉ. समाधान भगत, बाळासाहेब दांडेकर इ. अनेक सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य निरीक्षक, मुकादम,सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये