40 प्लस क्रिकेट स्पर्धेत कोथरुड मधील साई संघ विजेता ; 44 संघांच्या अटीतटीच्या लढती..

वारजेमध्ये पार पडली स्पर्धा ; वय विसरून जपली क्रिकेट खेळण्याची आवड
पुणे : वारजे येथील व्हिजन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 40 प्लस क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सहभागी झालेल्या 44 संघाच्या अटीतटीच्या लढती पहिला मिळाल्या. या स्पर्धेत कोथरूडमधील साई संघाने प्रथम क्रमांक तर डिंग डॉन्ग संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष होते. 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. सिनेअभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड यांनी या स्पर्धेला भेट देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या स्पर्धे दरम्यान जहांगीर हॉस्पिटल च्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीर तसेच व्यसनमुक्ती अभियान,सिरमा जिम तर्फे पाठीच्या दुखण्यावरती थेरेपी, एक साथ क्रिकेट मदत अभियान घेण्यात आले.

दरवर्षी दिला जाणारा सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा पुरस्कार या वर्षी पुणे वर्तपत्र संघांचे अध्यक्ष विजय पारगे व स्व. अभिजीत कदम प्रतिष्ठानचे कबड्डीचे मार्गदर्शक सागर खळदकर यांना देण्यात आला. या स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षेपण क्लीकलाईफ फाउंडेशन व क्षणचित्र मनोज यनपुरे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक मंडले, शैलेश निवंगुणे, विनोद चोरघे यांनी केले.



स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला आयडियल ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, सचिव शैलेश भुरसे, नितीन पळसकर, आशिष मारणे, प्रविण कोळेकर, कैलास लांडगे, धनंजय म्हसे, धनंजय जाधव, सचिन अमृतकर, संतोष रानवडे ,अभिजित सुतार,मेहेबूब शेख, एस एम व्ही 90ग्रुप उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन राहुल साठे, आयडियल स्पोर्ट्स, युनायटेड संघ, एस पी ग्रुप, एफ सी संघ, पुणे टेनिस क्रिकेट यांनी केले होते.
कामाचा व्याप व वाढलेले वय यामुळे आवड असूनही क्रिकेट खेळता येत नाही. अशा क्रिकेट प्रेमी मंडळींना आपली क्रिकेट खेळण्याची आवड जपता यावी यासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यातील प्रत्येक संघातील खेळाडू हा वयाची 40 वर्षे पार केलेला असतो. या स्पर्धेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला असून या स्पर्धेत वय विसरून खेळाडू खिलाडू वृत्तीने खेळत आहेत. 40 प्लस क्रिकेट संघटनेचीही स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांकडून सांगण्यात आले.






