पुणे शहर

कोथरूड भीम महोत्सव समितीच्या वतीने विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

कोथरूड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव समितीच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना समाज भूषण पुरस्कार कवी,अभिनेता किशोर कदम व पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या शाहिरी जलसातून उपस्थित आंबेडकरी जनतेमध्ये प्रबोधनाची ज्वलंत मशाल पेटवली. आपण काय करतोय, काय केले पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगून गेले यावर त्यांनी आपल्या शाहिरीतून प्रबोधनाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या कविता सादर त्यावर आपल्या शहीरीतून भाष्य केले. त्यांना  रत्नाकर शिंदे, विकी बागुल, वैभव पांडव, विशाल पारधे यांनी वाद्यवृंद म्हणून साथ दिली तर प्रिया दुनघव, बाबासाहेब भातखळे, धम्मसंदेश पुंडगे यांनी शाहिरी गायनात साथ दिली. किशोर कदम यांनीही यावेळी आपल्या कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

Img 20240404 wa00195661228638643442239

यावेळी मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, वसंत मोरे, तानाजी निम्हण, गजानन थरकुडे, मंदार जोशी, अमोल शिंदे, शिवाजी चव्हाण, जयंत भावे, दिपाली डोख, चेतन भालेकर, अनिरुद्ध खांडेकर, जयदीप पडवळ, अजय भुवड,  संदीप मोकाटे, श्रीकांत शिळीमकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कोथरूड भीम महोत्सव समितीने अध्यक्ष विजय डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

Img 20240404 wa00142311409567432001146

मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोथरूड भीम महोत्सव समितीच्या माध्यमातून विजय डाकले यांनी एक चांगली संकल्पना पुढे आणली आहे. वेगवेगळ्या पक्षातील, संघटनेतील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली एकत्र येतात आणि  समाजाचा विचार करतात ही एक चांगली गोष्ट आहे. समाजात राहत असताना समाजाप्रती कर्तव्याची भावना सर्वांमध्ये असणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक समरसतेचा आदर्श ठेवून त्यांना अपेक्षित समाजरचना आबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. राजकीय भिंतीच्या विचारा पलीकडे आपण कोथरूडमध्ये अनेक संस्कृती जपल्या आहेत त्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्व मोठे आहे.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, कोथरूड भीम महोत्सव समितीने मागच्या आठवड्यामध्ये १४ एप्रिल रोजी बुद्ध महावंदनेचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ घेऊन एक चांगली सुरूवात केली आहे. आज फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा जपण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.

Img 20240404 wa00154462680026350583661

यावेळी संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संविधान राहिले तर आपण आहे. संविधान मानवी जीवनासाठी महत्वाचे आहे म्हणून संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे मत माजी नगरसेवक तानाजी निम्हण यावेळी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचा हेतू सांगताना विजय डाकले म्हणाले, समाज एका विचाराने एकत्र आला तर समाजाचा विकास साधता येतो. त्यामुळे सर्व समाजबांधवांना एकत्र घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. समाजाचे जीवनमान बदलण्याची आज गरज आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन उच्च शिक्षण घेऊन मुलांनी आता झोपडपट्ट्यांमधून बाहेर आले पाहिजे. समितीच्या माध्यमातून बुद्ध विहारांचे आधुनिकीकरण केले जाणार असून त्यामाध्यमातून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. 

यावेळी भिमरत्न पुरस्काराने महापालिकेचे अधिकारी राम सोनवणे, ज्ञानेश्वर ओव्हाळ, पत्रकार जितेंद्र मैड, अनिल दरेकर, आरुष चव्हाण, मयूर भांडे, चंद्रकांत आवटी, यांना सन्मानित करण्यात आले तर माता रमाई भिमाई सावित्री पुरस्कार नीलीम पंडित, डॉक्टर रेणुका गोंदकर, अनुराधा एडके यांना देण्यात आला. तक्षशिला बुद्ध विहारास उत्कृष्ट बुद्ध विहार पुरस्कार दिला गेला. आश्वासक तरुणाई संघटन पुरस्कार मिलिंद संघास देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय डाकले , उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, दीपक कांबळे, सहकार्याध्यक्ष जितेश दामोदरे, सतीश रणावरे, उमेश कांबळे, खजिनदार अमोल जगताप, सहखजिनदार विजय मोघे, अशोक करंजकर, उत्सव प्रमुख दत्ता वडवेराव, बळीराम खळगे, राहुल वाघमारे, राजाभाऊ गायकवाड, सतीश खडके, सेक्रेटरी वसंतराव ओव्हाळ, दत्ता शेंडगे,  सारंग गायकवाड, केशव पवळे, सह सेक्रेटरी प्रदीप मदाळकर, पुंडलिक दुपारगुडे, अण्णा लोखंडे, संतोष मस्के, सुरेंद्र शिंदे, सोमनाथ गोरके, संघटक भारत भोसले, कैलास कदम, दयावान बचुटे, समाधान कीरतकर्वे,  सल्लागार ॲड. मंगेश कदम, ॲड. आनंद कांबळे, वसंत वाघमारे, नितीन कांबळे, तात्या कसबे, नागेश गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये