वारजेत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याचे कारण..

वारजे : वारजे परिसरात महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. वैशाली गायकवाड दिघे असे महिलेचे नाव असून नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवणे येथे राहत असलेल्या वैशाली गायकवाड दिघे या वारजे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला होत्या. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या करत असताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कामाच्या ठिकाणी होत असलेल्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे. चिठ्ठीत त्रास देत असलेल्यांची नावे ही लिहिली आहेत.

वैशाली गायकवाड दिघे, यांचे पती सुनील दिघे यांच्याकडून याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू असून लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.









