40% सह कर भरलेल्यांची रक्कम पुढील बिलात ॲडजस्ट करावी संदीप खर्डेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत करामध्ये 40% कर सवलत कायम करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास अनुसरून आधीच 40% सह कर भरलेल्यांची रक्कम पुढील बिलात ॲडजस्ट करण्यात यावे अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी निवेदनाद्वारे पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे मागणी केली आहे. खर्डेकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली 40% अन्याय्य मिळकत करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला.मात्र मनपा च्या सातत्याने पाठविल्या जाणाऱ्या नोटिशींना घाबरून अनेकांनी ही वाढीव रक्कम भरल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य शासनाने ही अन्यायकारक वाढ रद्द केल्यामुळे 40% कर सवलत कायम करण्याच्या राज्य सरकार च्या निर्णयास अनुसरून आधीच 40% सह कर भरलेल्यांची रक्कम पुढील बिलात ॲडजस्ट करावी किंवा रिफंड द्यावा अशी आग्रही मागणी करत आहे. अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.



