कोथरुड

गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर घेत कोथरूड मधील संघर्ष मित्र मंडळाने बजावले सामाजिक कर्तव्य 

कोथरूड : हॅपी कॉलनीतील संघर्ष तरुण मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत आपले सामाजिक कर्तव्य बजावले आहे. मंडळाने लायन्स क्लब ऑफ २१ सेंचुरी, पिंपरी चिंचवड रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. 

संघर्ष तरुण मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. मंडळाच्या वतीने नियमित सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी मंडळाचे कायम तत्पर असतात. मंडळाने गणेशोत्सव सामजिक उपक्रमाने साजरा करायचे ठरवले होते. त्यानुसार हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचे मंडळाचे संस्थापक योगेश निंबरे यांनी सांगितले. 

Img 20230926 wa00133099930587067086837
संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या गणरायाची आकर्षक मूर्ती

रक्तदान शिबिराचे संयोजन मंडळाचे संस्थापक योगेश निंबरे, सुनील कुंभार, मारुती दोडमणी, शंकर साखरे, माधुरी पंडित, युवराज बडगुजर यांनी केले.  यावेळी भाजपचे पुनीत जोशी, माजी नगरसेवक जयंत भावे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कांचन कुंबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  शहराध्यक्ष किशोर कांबळे, राहुल खंदारे, आरपीआयचे सत्येश हिरवे, राजेश सुब्रे, अजय गायकवाड उपस्थित होते. 

मारुती दोडमणी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत तर सुनील कुंभार, शंकर साखरे, मंगेश निंबरे ये उत्सवप्रमुख आहेत. यावेळी मंडळाचे अनिल विटे, रवींद्र कदम, आदित्य गायकवाड, बौद्धजय आदमाने, शफिक मुज्जा, समर्थ हिंगडे, सारंग भोसले, आलोक भोसले, शफीक मुल्ला, आदित्य सुर्यवंशी, अनमोल सोनवणे, अक्षय कामठे, अभिजित देशमाने, विजय नाईक, मयूर वाघ आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लायन्स क्लबचे माधुरी पंडित बलजीत सिंग राणा जितेंद्र कांतीलाल, युवराज बडगुजर उपस्थित होते. 

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये