पुणे शहर

पुण्यातील शाळा गुरुवारपासून (ता.१६) सुरू महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा ह्या दिनांक 16 डिसेंबर पासून आपण सुरू करत आहोत. पहिली ते सातवी इयत्तेचे वर्ग हे १६ तारखेला सुरू होत आहे. हा निर्णय करताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार विभागीय आयुक्त सर्व जिल्हा आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या समवेत चर्चा झाली आणि हा एकमताने निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मोहोळ म्हणाले, की सर्व ज्या काही गाईडलाईन्स दिलेले आहेत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या शाळेमधील सर्व निर्जंतुकीकरण करणार,सोशल डिस्टंसिंग पालन योग्य पद्धतीनं करणं,योग्य पद्धतीनं सगळ्या सूचना देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथली सगळी व्यवस्था ही तयार करून या शाळा आता गुरुवारपासून सुरू होत आहेत.त्यामुळे पुण्यातील शाळा कधी सुरू होणार हा एक गेल्या अनेक दिवस सुरू असलेला विषय आता मार्गी लागला आहे आणि गुरुवारपासून महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा सुरू होत आहेत.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये