कोथरूड हनुमाननगरमधील संस्कृती डोख हीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत मिळवले यश..

संस्कृती डोखवर होतोय कौतुकाचा वर्षाव
कोथरूड : कोथरूड मधील हनुमाननगर मध्ये राहणाऱ्या डॉ. संस्कृती सुनिल डोख हीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. तिने राज्यसेवा २०२२ परीक्षेतून Gazetted Officer (महाराष्ट्र शासन) तसेच संयुक्त परीक्षा 2023 मधून उपनिबंधक (Sub Registrar Grade A) व State Tax Inspector या तिन्ही पदी निवड झाल्याबद्दल कोथरूड भागात तिचे कौतुक केले जात आहे. ठिकठिकाणी सत्कार समारंभ घेऊन संस्कृती हिचा सन्मान केला जात आहे.
संस्कृती हीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश मिळवले आहे. या यशानंतर बेलावडे मुळशी, हनुमाननगर कोथरूड, दत्तवाडी या ठिकाणी तिचा सत्कार समारंभ करण्यात आला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रविंद्र धंगेकर, हर्षवर्धन मानकर, दिपाली डोख व हनुमाननगर येथील सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संस्कृतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आई वडिलांचा तसेच गुरूवर्य धनंजय वाडकर व मीरा वाडकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. एकता मित्र मंडळ, सोहम प्रतिष्ठान, लकी क्रिकेट क्लब येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात जनसेवेला प्रथम प्राधान्य देऊन यापुढे काम करेन असे मत डॉ. संस्कृती यांनी व्यक्त केले. यावेळी डोख कुटुंबियांच्या वतीने संतोष डोख यांनी सर्वांचे आभार मानले.









