संविधान दिनानिमित्त कोथरुडमध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन..
कोथरूड : संविधान दिनानिमित्त कोथरूड संविधान सन्मान कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त कोथरूड संविधान सन्मान कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ, राजाभाऊ गायकवाड, अमोल जगताप, सिद्धार्थ उजागरे, केशव पवळे, अमित तुरुकमारे अन्य सर्व पदाधिकारी यांच्या वतीने कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात संविधाना अमृत महोत्सवी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संविधानास अभिवादन करण्यासाठी भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सुशील मेंगडे, दुष्यंत मोहोळ छाया भोसले, योगेश राजापूरकर, नितीन शिंदे, कैलास मोहोळ, सुहास साठे, मिलिंद संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग ही उपस्थित होता.
संविधानाचे महत्त्व घराघरात, मनामनात पोहोचवणे हेच या कार्यक्रम घेण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे बाळासाहेब खंकाळ यांनी सांगितले. याप्रसंगी सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि संविधान अंगीकृत करण्याची शपथ घेतली.