राष्ट्रीय
राजीव गांधी हत्येप्रकरणातील आरोपीच्या सुटकेचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
पेरारिवलन 30 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले होते की, जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही त्याची सुटका करू. त्याच प्रमाणे आज न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले.




