महाराष्ट्र

केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी संपल्यानंतर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

केतकी चितळेच्या पोस्टनंतर त्यावर सर्व स्तरातून आणि पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. राज्यात दहा विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी चौकशीनंतर ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये