रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी विनोद मोहिते यांची निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार

पुणे : भारतीय जनता पक्षाचे विनोद मोहिते यांची रेल्वे सल्लागार समिती पुणे विभाग सदस्यपदी निवड करण्यात आली असून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विनोद मोहिते यांना नियुक्ती पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न आहेत. रेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून या समस्यांचे चांगल्या पद्धतीने निवारण करता येते. विनोद मोहिते सर्वसामान्य प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप बुटाला, सचिन पाषाणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विनोद मोहिते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने आणि चंद्रकांत दादांनी मला रेल्वे सल्लागार समितीची जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिक पणे काम करून या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
















