शरद पवार यांच्या हस्ते होणार सचिन दोडकेंच्या प्रयत्नातून झालेल्या वारजेतील ४५ मीटर उंच राष्ट्रध्वजाचे व सुशोभीकरण कामांचे उद्घाटन

वारजे : वारजे परिसराच्या विकासाबरोबरच वारजे च्या सौंदर्यात ही भर पडत असून नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नातून झालेल्या वारजेतील विविध सुशोभीकरण कामांचे , महानगरपालिकेच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे व वारजेत पहिल्यादांच घेण्यात येत असलेल्या सुंदर फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शनिवारी २३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. वारजे परिसरामध्ये सध्या अतिशय सुंदर असे सूशोभिकरण करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. या सुशोभीकरणामुळे वारजे परिसराचा विकास होत असताना त्याच्या सौंदर्यात ही भर पडत आहे. वारजेकरांना २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान सुंदर फुलांचे प्रर्दशन अनुभवता येणार आहे.

ही एक वेगळीच पर्वणी वारजेकरांसाठी असणार आहे. सुमारे १७ गुंठे जागे मध्ये हे प्रर्दशन लावण्यात येणार आहे. आतापर्यंत फुल प्रदर्शन म्हंटले की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज उद्यान किंवा फुलपाखरू उद्यानात जावे लागत होते पण आता वारज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचे विविध फुलांचे प्रर्दशन भरवण्यात येणार आहे.
वारजे परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन ४५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. याचबरोबर वारजेकरांसाठी l love warje असा एक आपल्या वारजेचा अभिमान वाटावा असा सेल्फी पॉइंट आरएमडी काॅलेज समोर लावण्यात आला आहे. तसेच ६०० मीटर भिंतीवर मनाला मोहणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. या सर्व गोष्टीमुळे वारजे परिसराचे नेत्रदीपक दृश्य वारजेकरांना अनुभवायला मिळणार असल्याचे सचिन दोडके यांनी सांगितले.












