शरद पवार यांची करोना चाचणी निगेटिव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील सहा कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यात स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा व काही सुरक्षा रक्षकांच्या समावेश असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी पवार हे कराड दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यात असलेले मंत्री बाळासाहेब पाटील यांनाही करोना झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे शरद पवार यांची करोना चाचणी करण्यात आली होती. हि चाचणी निगेटिव्ह अाल्याने दिलासा मिळाला आहे. आता इतर कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन स्वीय सचिवांपैकी एकाची चाचणी निगेटिव्ह आली असून एकाचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे





Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.