पुणे शहर

पुणे शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात – शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मागणी

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जगामध्ये कोविड-१९ च्या आपत्तीस एक वर्ष पूर्ण होऊन गेले. डिसेबर २० च्या पर्यंतच्या पहिला टप्पा आपल्या प्रशासनासह डॉक्टर नर्सस,सर्व कर्मचारी,सर्व कोविड योध्दाचा प्रयत्नामुळे आटोक्यात आला. परतु आता जानेवारी पासुन दुसरा टप्पा सुरू झाला. २२ मार्च अखेर रुग्णाची सख्या तीन हजारवर गेलेली आहे. ही गंभीर गोष्ट आहे. तरी या आपत्कालीन परिस्थितीत पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

सुतार म्हणाले, सध्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत उपाय योजना करताना प्रशासन सपूर्णपणे उदासीन आहे.असे
दिसत आहे.रुग्णाना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत,डॅश बोर्डवर चुकीची माहिती दिली जाते. डॅश बोर्डवरील माहिती प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीमध्ये मोठया प्रमाणात तफावत आहे. स्वब सेटरवरती पोसिटीव्ह रुग्णाना होम कॉरन्टाईन करण्यासाठी पत्र मिळत नाही औषधे मिळत नाही. त्याना खासगी डॉक्टरकडे किवा हॉस्पिटलकडे जाण्यास सागून तेथूनच पत्रे व औषध घेण्यास सांगितले जाते.

Img 20210319 wa0097

साधारण तीन आठवडयापूर्वी झालेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीमध्ये मी वारवार मागणी केली होती की cccसेन्टर चालू केले पाहिजेत.खाजगी रुग्णालयाशी MOU केले पाहिजेत परंतु अदापपर्यत एकही ccc सेन्टर सुरु झाले नाही. व फक्त एकच MOU केलेला आहे याचा अर्थ प्रशासन व सत्ताधारी या दुसऱ्या टप्प्यास गभीरतेने घेत नाहीत या आपत्तीशी आपला कसलाच सबध नाही अशा प्रकारे काम चालू आहे.

सुतार यांनी पत्राद्वारे पालिकेकडे या मागण्या केल्या आहेत.

१) जम्बो सेविड रूग्णालयामध्ये रुग्णाना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करावी.
२)ccc सेन्टर सुरु करावे
३) सेंटरवर होम कॉरन्टाईनचे पत्र व औषध देण्याची व्यवस्था करावी.
४) खाजगी हॉस्पिटलशी त्वरीत MOU करून मनपाचे बेड राखीव ठेवावेत.
५) डॅश बोर्डवरील माहिती खरी व योग्य ती मिळेल याची दक्षता घ्यावी.
पुणे शहरातील कोरोनाचा ससर्ग कमी करण्यासाठी कोरोनाच्या रुग्णाची संख्या नियत्रित करण्यासाठी व
रुग्णांचे मृत्यु रोखण्यासाठी वरील सुचनाची त्वरीत अंमलबजावणी प्रशासनाने करावी. अशी मागणी सुतार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये