पुणे शहर

बोपोडीतील वाहतूक समस्या दोन दिवसात सुटेल- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे :मेट्रोच्या कामासाठी बोपोडी -खडकी येथे एकेरी वाहतूक केल्याने वाहतुकीची निर्माण झालेली समस्या दोन दिवसात सुटेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

बोपोडी -खडकी येथील वाहतूक समस्येची पाहणी पोलीस निरीक्षक जोशी आणि स्थानिक कार्यकर्त्यांसह आमदार शिरोळे यांनी केली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाबर यांच्याशीही फोनवर चर्चा केली.

Img 20210319 wa0097

येत्या दोन दिवसात दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांसाठी, पादचाऱ्यांसाठी सर्व्हीस रोड तयार केला जाईल, त्यामुळे मेट्रोचे काम चालू राहील आणि वाहतुकीला पर्यायी मार्ग मिळेल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या वेळी शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष रविन्द्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, सरचिटणीस आनंद छाजेड, गणेश नैकरे, सचिन वाडेकर, खडकी मंडळ अध्यक्ष धर्मेशजी शहा, मा.नगरसेवक कमलेशजी चासकर, सरचिटणीस शाम काची, सरचिटणीस संजय फेंगसे, सरचिटणीस धीरज गुप्ता, खडकी महिला मंडळ अध्यक्ष नेहा गोरे, चिटणीस सनी गोयल, उपाध्यक्ष मालोजी गाडेवार, उपाध्यक्ष ललित जैन व कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20210313 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये