पुणे शहर

कोथरूडमधील युवकाला राहुल गांधींबरोबर चालण्याची मिळाली संधी ; बेरोजगारीच्या प्रश्नावर केली चर्चा

पुणे : कोथरुड मधील युवकाला भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या बरोबर चालण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग करत या युवकाने तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडत सद्य परिस्थिती त्यांच्यासमोर कथन केली. याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी पुढील सभेत आपल्या भाषणात तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्नावर कडक शब्दात भाष्य केले.

विद्यार्थी काँग्रेसचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष राज जाधव यांना शेगाव बुलढाणा येथे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालण्याची संधी मिळाली जाधव यांनी चालताना राहुल गांधी यांच्या समोर बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित करत आज इंजिनियर झालेल्या मुलांना देखील कशा पद्धतीने कमी पगारावर काम करावे लागत आहे हे सांगितले. जाधव यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद वाढवत आणखी माहिती घतली. साधारण एक मिनिट जाधव यांना हा संवाद साधता आला.

आपल्या नेत्याने आपल म्हणणं येकुन घेतलं याच समाधान तर मिळालच पण त्यांना भेटण्याचं मनातलं स्वप्नही पूर्ण झालं. या भेटनंतरच्या पुढील सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न उपस्थित केल्याने आपला नेता किती संवेदनशील आहे याची प्रचिती आल्याचे राज जाधव यांनी सांगितले. या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी जनसामन्यांचे प्रश्न जाणून घेत असून भविष्यात तेच हे प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास स्वतः इंजिनियर असलेल्या राज जाधव यांनी व्यक्त केला.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये