पुणे शहर

पुणे महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर पालिकेच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करण्याची शिवसेनेची मागणी

पुणे : 1 मार्च 2021 पासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षे ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबतच तिसरा टप्पा सुरू झाला आहे. सदरची लस ही मनपा रूग्णालये, शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांतून देणार आहे. मनपा व शासकीय रूग्णालयामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. मात्र सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरीकांना त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व मनपाच्या लसीकरण केंद्रावर खालील सोई सुविधा उपलब्ध करून दयाव्यात. अशी मागणी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

सुतार म्हणाले, सदर तिसरा टप्पा सुरू होत असताना लसीकरण केंद्रावर मोठया प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना कशा प्रकारे प्रक्रिया करायची याबाबत अपुरी माहिती मिळत असून केंद्रावरती असलेल्या स्टाफला व डॉक्टरांना सुध्दा पुर्णपणे माहिती नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक त्याठिकाणी येत आहेत, अशा प्रकारे जर हजारो नागरिक एकत्र आले तर कोविडची समस्या दूर होणेऐवजी सदर समस्या अजून गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने सोयी सुविधा उपलब्ध करावी.

Img 20210223 wa0156

या सोयी सुविधा उपलब्ध करण्याची सुतार यांची मागणी

1.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सुविधा फ्लेक्स, बॅनर, रुग्णालयाचे दर्शनी भागावर, गेटवर लावावेत.
2.प्रत्यक्षात जावून अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सुविधा फ्लेक्स, बॅनर, रुग्णालयाचे दर्शनी भागावर, गेटवर लावावेत अर्ज भरणा-यांची वेगळी रांग
4.लस घेणा-यांची वेगळी रांग
5.ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळा असल्यामुळे सदरच्या केंद्रावर मंडपाची व खुच्यांची व्यवस्था
6.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
7.दररोज किती नागरिकांचे लसीकरण होणार आहे याची माहिती जाहिर करावी.
8.कोणकोणते आजार असलेल्या 45 वर्षापुढील नागरिकांना लस मिळणार त्या आजारांची यादी फ्लेक्स व
बॅनरद्वारे दर्शनी भागात लावावेत.
या सोईसुविधा जर उपलब्ध केल्या तर निश्चितच नागरिकांना या लसीकरण मोहिमेचा फायदा होईल
व लसीकरणाचा तिसरा टप्पा यशस्वी होण्यास मदत होईल,
अशी मागणी सुतार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये