पुणे शहर

गतिमंद मुलीच्या मृत्यूप्रकरणी भाजपा कोथरुड महिला मोर्चाचे निवेदन

पुणे : भुसारी कॉलनी येथील ‘सावली मतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी प्रतिष्ठान’ या संस्थेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या  33 वर्षीय या गतिमंद मुलीचा दुसऱ्या एका अल्पवयीन गतिमंद मुलीने संस्थेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन खून केल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आज याबाबत कोथरूड भाजपा महिला मोर्चा टिमने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

Img 20210223 wa0156

व संबंधीत संस्थाचालकांना भविष्यात अश्या प्रकारच्या घटना आपल्या संस्थेत घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी व तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात जेणेकरून भविष्यात अश्या घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबतचे निवेदन देण्यात आले. यानंतर संबंधीत गृन्हा नोंद झालेल्या कोथरुड पोलीस स्टेशनला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेऊन त्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी कोथरुड महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे,
उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझिरे, चिटणीस लता उभे, जयश्री टेमघेरे, सोशल मिडिया प्रमुख कल्याणी खर्डेकर, कार्यकारिणी सदस्या सविता शिंदे, सागर कडू अध्यक्ष प्रभाग क्रमांक 10 खडकवासला मतदारसंघ , कैलासजी मोहोळ अध्यक्ष प्रभाग क्रमांक 10 कोथरूड मतदारसंघ, स्वीकृत सदस्य वैभवजी मुरकुटे, कोथरूड मंडल चिटणीस प्रदीपजी जोरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये