पुणे शहर

कोथरूड मधील शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांचा भाजप मध्ये प्रवेश 

पुण्यात शिवसेने उध्दव ठाकरे पक्षाला मोठा धक्का ..

पुणे : शिवसेना उध्दव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार यांचे पुत्र व माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थिती मध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोन शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पृथ्वीराज सुतार यांच्या भाजप प्रवेशा विषयी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज सुतार यांचा भाजप पक्ष प्रवेश पार पडला आहे.

Img 20251125 wa00126624322614302660332

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये