पुणे शहर
अजित पवार यांच्या हस्ते वारजेत वनोद्यानाचे भूमिपूजन ; अजित पवारांनी भाषणातून केली फटकेबाजी : पाहा संपूर्ण व्हिडिओ

पुणे : वारजे येथील डुक्कर खिंड येथे विरोधी पक्षनेता दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून व पुणे महापालिका व वन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या 35 एकर जागेतील व उद्यानाचे भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वनमंत्री दत्तात्रय भरणे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, क्रांतिवीर लहुजी वस्ताद समितीचे अध्यक्ष विजय डाकले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केले होते.




