महाराष्ट्र

संजय राऊत तुरुंगाबाहेर, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले ”आम्ही लढणारे…”

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. १०२ दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं पाहायला मिळालं. पूर्वीच्याच जोषात संजय राऊतांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले. आम्ही लढणारे आहोत, लढतच राहू, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Img 20221108 wa03111149523490358263271

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी गळ्यातील भगवं उपरणं फडकावून आणि हात जोडून अभिवादन केलं. आर्थर रोड तुरुंग परिसरात संजय राऊत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि बॅनरही झळकवण्यात आले.

Screenshot 2022 11 08 17 30 12 863027856036357080963

दरम्यान, १०० दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. पण या जामीनाविरोधात ईडीने पुन्हा हायकोर्टात अपील केलं. मात्र यावेळी मुंबई हायकोर्टाने ईडीला चांगलंच झापलं. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली. त्यांना १०० दिवस जेलमध्ये ठेवलं. याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या लगोलग अपील करण्याने आम्ही काही क्षणांत राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, असे सांगतानाच मुंबई हायकोर्टाने ईडीला जोरदार चपराक लगावली.

Wp story1667912153657 39153455869959519390
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये