पुणे शहर

श्री सद्गुरु संस्कार निवासी शिबीरात वारकरी पाऊले व खेळात मुले झाली दंग..

मुळशी : श्री सद्गुरु संस्कार निवासी शिबीर, नानेगाव मुळशी येथे मृदंग विशारद ह.भ.प. गणेश शेडगे यांच्या मार्गदर्शना खाली उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये- साधू-संत आणि शूरवीरांची जीवन चरित्रे, अखंड नामजप, संगीतमय हरिपाठ आणि विविध पद्धतीने खेळली जाणारी वारकरी पाऊले व खेळ घेण्यात आले.

आठ दिवस चाललेल्या या शिबिरात ह.भ.प. राजेंद्र महाराज दहीभाते, विजय दादा जगताप, पांडुरंग (पंडित) भाऊ जगताप, राजेंद्र महाराज येप्रे, धर्मराज महाराज हांडे, संतोष महाराज पायगुडे, डॉ. दिलीपजी सातव, ईश्वर महाराज नलावडे, शेखर महाराज जांभुळकर, दत्तात्रयजी तेरडाळे, ज्ञानेश्वर माऊली देशमुख, मंगेश दादा कदम या अशा बऱ्याच मान्यवरांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान व उपासना, आहाराचे नियोजन, व्यायाम प्रकार अशा विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

Img 20220504 wa0225 1

संस्कार शिबिराची सांगता, काल्याचे कीर्तन,  ह.भ.प.श्री. गणेश महाराज कारले यांची सेवा झाली. तसेच या संस्कार शिबिरास नानेगाव ग्रामस्थ, कर्वेनगर हिंगणे बु.।। ग्रामस्थ आणि इतर मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवारांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये