मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत : संजय राऊत

मुंबई : “आपले पंतप्रधान जरी मास्क लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचं ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात पण मोदी देशाचे नेते असून कुठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत आणि मी देखील त्यांचं आचरण करतो. त्यामुळे मोदींनीसुद्धा मास्क लावावा, नियमांचं पालन करावं,” अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
निर्बंध आले की, पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, काम, रोजगार यावर फार मोठे संकट येईल. ते येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. लग्नं, मुहूर्त आधीच ठरले असून लोक नियमांचं पालन करत असल्याचं मी पाहिलं आहे. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांनी अनेक लग्नांमध्ये हजेरी लावली. मीदेखील त्यांच्यासोबत होतो. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांनादेखील लागण झाली असून आपण काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.



