पुणे शहर

ऐतिहासिक वारसा असलेल्या भिडे वाड्याचे प्रलंबित प्रश्न सोडवून नियोजित काम त्वरित सुरू करा : दीपक मानकर

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली होती. आज या वास्तूची अवस्था फारच बिकट झाली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने येथील प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा काढून वाड्याचे प्रलंबित प्रश्न सोडवून नियोजित काम त्वरित सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. यावेळी दीपक मानकर यांच्या समवेत राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा प्रिया गदादे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष शुभम माताळे, दत्ता सागरे, विरेंद्र किराड, अशोक जाधव, प्रशांत भाडळे, अजय दराडे आदी उपस्थित होते. वाड्याचे प्रलंबित प्रश्न सोडवून नियोजित काम त्वरित सुरू करावे, यासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

भिडे वाड्याचे काम कोर्ट, सरकारचा निधी आणि राजकारण यामध्ये अडकले आहे. यातून तातडीने मार्ग काढून ही एतिहासिक वास्तू चांगल्या पद्धतीने जतन केली जावी जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्यामधून प्रेरणा मिळेल असे मानकर यांनी म्हंटले आहे.

या सोबतच पुणे महापालिकेतील स्वच्छता कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत तसेच कोथरूड पुणे -३८ परिसराला जोडणारा पक्का रस्ता विकसित करण्याबाबत आणि यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांना मार्गी लावण्यासाठी यावेळी सकारात्मक चर्चा झाली. महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे मानकर यांनी सांगितले.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये