पुणे शहर

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; पाठलाग करून पकडला अवैध दारूचा टेम्पो..

पुणे : पुण्यात पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा माल सापडला असून  चालकाला अटक केल्यानंतर पुढे आलेल्या माहितीवरून दारु बनवत असलेल्या ठिकाणी छापा मारून ५,०४,५५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

आज निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २
पुणे कार्यालयातील अधिकारी व स्टाफसह  पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते. मौजे लोणी काळभोर परीसरात एक संशयीतरित्या टेम्पो जात असताना त्यांना आढळून आला. सदर टेम्पो चालकाने राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाची गाडी पाहताच टेम्पोचा वेग वाढवला. त्यामुळे संशय बळावल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून टेम्पो अडवुन तपासणी केली असता त्यात गावठी दारू भरलेले ३५ लीटर क्षमतेचे २० कॅन, ७००लीटर तयार गावठी दारू आढळून आली.

टेम्पो चालकास अटक करून चौकशी केली असता त्याने सदर गावठी दारू राधेश्याम हरीराम प्रजापती याच्या लोणीकाळभोर गावचे परीसरातील एम.आय.टी. कॉलेज मागील बाजूस, मुळा नदीकाठी, मोकळ्या जागेत गावठी दारूची निर्मिती केंद्रावरून आणल्याचे सांगितले.

Img 20220513 wa0189

या माहितीच्या आधारे पथकातील अधिकाऱ्यांनी सर्व संबधित ठिकाणी जाऊन  अचानकपणे छापा घातला असता २००० लीटर रसायन, २४५ लीटर गावठी दारू, २०० कि.ग्रॅ. गुळ, अंदाजे २०० कि. ग्रॅ. भट्टीसाठी लागणारे जळाऊ सरपन, ०२ अल्युमिनिअम थाळ्या व चाटू, लोखंडी
बॅरल, प्लॅस्टिक कॅन व गावठी दारू तयार करण्याकरीता लागणारे इतर साहित्य असा मुद्देमाल किंमत रू.
१,०४,५५०/- व अशोक लेलॅण्ड कंपनीचा पांढ-या रंगाचा दोस्त LX (CNG) चारचाकी क्र. एमएच १२
एस.एक्स. ८७२५ किंमत रू. ४,००,०००/- असा एकूण रूपये ५,०४,५५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारु व बनवण्यासाठी लागणारे साहित्य
नाश करण्यात आले आहे.

सदर कारवाईत टेम्पो चालक रामकिशन गणेशराम प्रजापती (वय २२ वर्षे सध्या रा. दत्तवाडी, उरूळीकांचन, कायम रा. रिछा गुर्जर, ता. जावरा, रतलाम मध्यप्रदेश) राधेश्याम हरीराम प्रजापती (वय ३२ वर्षे स. नं. ५३/८, मॉरीस बेकरीजवळ, काळेपडळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक तानाजी बी. शिंदे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, पी. एस. धाइंजे यांसह सदर कारवाईत जवान एन. जे. पडवळ, एस.बी. मांडेकर, ए. आर. सिसोलेकर, बी. आर. सावंत, के. आर. पावडे व महिला जवान सी. एम. एम. भोसले यांनी सहभाग घेतला.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये