पुणे शहर

नवले पुलाजवळ विचित्र अपघात ; ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ने 35 ते 40 वाहनांना उडवले

पुणे : नवले पुलाजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने 35 ते 40 वाहने एक मेकांवर आदळत विचित्र अपघात झाला आहे. या घडलेल्या भीषण अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे नवले पुलाजवळील अपघाताचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

दरम्यान या विचित्र अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

रविवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर अग्निशामक दल, पीएमआरडीए यांनी बचाव कार्य केले. हा अपघात एवढा भीषण होता की ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ने धडाधड 35 ते 40 वाहनांना उडवले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शिंचा हा प्रकार पाहून एकच थरकाप उडाला.

नवले ब्रीज हा अपघाताचा हॉट स्पॉट आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात घडत असतात. काल झालेल्या अपघाता प्रमाणे अनेक विचित्र आणि गंभीर अपघात या टप्प्यात घडले आहेत. त्यामुळे येथील अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये