पुणे शहर, जिल्हा

दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले शालेय साहित्य..मुलांच्या चेहऱ्यावर आनंद

कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील आवाहनाने उभा राहिला एक अनोखा उपक्रम

कर्वेनगर : मोरया मित्र मंडळाच्या वतीने दुर्गम भागात शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मोरया मित्र मंडळाने या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव काळात तुमचे शैक्षणिक दान ठरेल विद्यार्थांसाठी योगदान हा उपक्रम राबविला होता. मंडळाने एक आवाहन केले होते, श्री गणेश चरणी कोणत्याही प्रकारचा प्रसाद, हार, नारळ, पेढे अर्पण न करता वही, पेन, दप्तर, शालेय साहित्य अर्पण करावे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला होता.

Img 20250508 wa00015038950216212096978

मंडळाने केलेल्या आवाहनानंतर भरपूर प्रमाणात वह्या, पुस्तके, दप्तर, कपडे जमा झाले. ते सर्व साहित्य मुळशी तालुक्यातील दुर्गम भाग भोईनी, मुगाव ,गडले ह्या भागात वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना पहिली ते चौथी मुलांसाठी चित्रकला वही, इंग्रजी अंक,अक्षर सरावासाठी पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, कपडे, रंग पेटी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार वसंत मारणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळला पाहिजे व वाचनावर भर दिला पाहिजे.  विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, धैर्य, एकाग्रता, ठेवल्यास त्यांना निश्चित यश संपादन करता येते.  विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. 

Fb img 17620776420884188237802217418510

यावेळी खारवडे श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संभाजी गावडे म्हणाले  मोरया मित्र मंडळाचे  कार्य कौतुकास्पद आहे. मंडळ कोणताही डिजे न लावता धांगडधिंगा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करते. मंडळाचे सर्वच कार्यक्रम  महाराष्ट्र राज्यात पोहचले आहे.

यावेळी इतिहास संशोधन मंडळ अजीवन सदस्य मंगेश नवघणे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संभाजी गावडे, समीर राऊत , भोईणी ग्रां.प विद्यमान सरपंच अलका संतोष झोरे, माजी सरपंच सुनील झोरे,  माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण झोरे,  विद्यमान उपसरपंच विशाल झोर, मुगाव/कोळोशी/गडले ग्रुप ग्रां.प विद्यमान उपसरपंच मुगाव मारुती कोकरे, तंटामुक्ती अध्यक्ष पोपटराव पासलकर, संतोष झोरे, शिक्षक सागर शिंदे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये