पुणे शहर

पुण्यात सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी सुचवलेल्या केंद्रावरच जास्त लसींचा पुरवठा ; दिपाली धुमाळ यांचा आरोप

सर्व केंद्रावर समान पुरवठा करण्याची मागणी..

पुणे :  पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यावर लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. पुणे महनगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी करण्यात येणारा लस पुरवठा हा समान नसल्याचे निर्दशनास येत आहे. याबाबत माहिती घेतली असता सत्त्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या  व पदाधिका-यांनी सुचिविलेल्या लसीकरण केंद्रावर जास्त लसींचा पुरवठा होत असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. सर्वच नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याने सर्वच केंद्रावर सामान लसींचा पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. Supply of more vaccines at the center suggested by the ruling BJP corporators;  Allegation of Deepali Dhumal

IMG 20210428 WA0187

धुमाळ यांनी म्हंटले आहे की, महापालिकेतील सत्त्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांच्या  व पदाधिका-यांनी सुचिविलेल्या लसीकरण केंद्रावर जास्त लसी दिल्या जात आहेत तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या लसीकरण केंद्रावर त्यामानाने खुप कमी लसींचा पुरवठा होत असल्याचे निर्दशनास आले आहे. हा प्रकार खेदजनक आहे. 

कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये  लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण  झाली आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. तसेच समान लस पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे व अनेक केंद्रांवर गोंधळ निर्माण होत आहे.  काही नागरिक सकाळ पासुन  रांगा लावतात व लस न मिळाल्याने त्यांना परत घरी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील लसीकरण केंद्रावर लोकसंख्येच्या मानाने कमी लसींचा पुरवठा होतो तोही वाढवण्याची अत्यंत गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

IMG 20210507 WA0009

त्यामुळे  पुणे महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी समान लसींचा पुरवठा करण्यात यावा, तसेच लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा सुध्दा वाढवण्यात यावा अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये