पुणे शहरराजकीय

पुणे महापालिकेची प्रभाग रचना १ फेब्रुवारीला जाहीर होणार..

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने अखेर महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार असून हरकती व सूचना, त्यावरील सुनावणी  2 मार्च रोजी ती अंतिम केली जाणार आहे.

यानंतर आरक्षण सोडत  काढली जाणार असून त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पुणे महापालिके मध्ये 58 प्रभाग असतील व प्रत्येक तीन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या 61 हजार 669 च्या आसपास असेल. निवडणूक आयोगाने 2011 या
वर्षाची जनगणना अर्थात 35 लाख 56 हजार 824 ही समोर ठेवून ही रचना केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात साधारण मतदार संख्या ही 56 हजारांच्या आसपास राहणार आहे.

Screenshot 20220130 0926413984204145128368157
Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये