राजकीय

राष्ट्रवादीचं अध्यक्षपद अजित पवारांकडे कि सुप्रिया सुळेंकडे नेमके काय? वाचा सविस्तर …

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर पक्षाची केंद्रातील धुरा सुप्रिया सुळे तर राज्यातील निर्णयांची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त झाल्यानंतर सुरुवातीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा होती. मुंबईत सध्या वाय.बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. 

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळे केंद्रीय अध्यक्ष असतील आणि अजित पवारांकडे राज्यातील राजकीय निर्णयाची जबाबदारी असेल, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे २००६ पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. सुप्रिया सुळे २००६ राज्यसभेच्या खासदार बनल्या होत्या. त्यानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत्या. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील राजकीय निर्णय अजित पवार घेतील, असा तोडगा निघाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ याबाबत म्हणाले की, शरद पवार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये