जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा, बावनकुळे यांचं शरद पवार यांना आवाहन

पुणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने आव्हाड यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही. आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.
पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये 60 वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता गेलेले शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले.

शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.









