महाराष्ट्र

MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाही”

पुणे : महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे. महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. ३२ संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती. तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. “राज्य सरकारला या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. उलट पुढच्या तीन वर्षांत या तीनही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही.”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

“ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, तसे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे फडणवीस म्हणाले. समांतर खासगी परवाने देण्याबद्दल अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, समांतर परवाने पद्धतीला विरोध करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. याबद्दल कर्मचाऱ्यांची समजूत घालताना ते म्हणाले की, हे नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढले आहे. जेव्हा एमआरसी यावर नोटीफिकेशन काढेल त्यात आपण सरकारची सर्व बाजू मांडू.”

“कंपनीच्या हिताचाच निर्णय एमआरसीच्या माध्यमातून झाला पाहीजे, असे राज्य सरकारचे स्पष्ट धोरण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच संघटना आणि सरकारची बैठक यापुर्वीच झाली असती तर गैरसमज निर्माण झालेच नसते. सरकारने मांडलेली भूमिका संघटनांना पटले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री फडणवीस यांनी केला.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये