पुणे शहर

भाजपा कोथरुड मतदार संघ मध्य मंडलाची कार्यकारिणी जाहीर..

भाजपा मध्ये पद म्हणजे जबाबदारी – चंद्रकांत पाटील

कोथरूड : भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते. पक्षाकडून आज ज्यांना पद मिळाले, ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान मोदींजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करीत आहे. जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे. हे सर्वापर्यंत पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कोथरुड मध्य मंडलाची कार्यकारिणी आज जाहीर होऊन  मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

Img 20250508 wa0001235733770892078245

पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये मिळणारे पद हे केवळ नावापुरते पद नसून ती जबाबदारी असते. ती देत असताना सर्व कार्यकर्त्यांचा विचार होतं असतो. त्यामुळे आज ज्यांना ज्यांना पद मिळाले आहे, त्यांनी पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्याकडे अनेक कार्यकर्ते असेही आहेत, ज्यांचा प्रवास बूथ अध्यक्षापासून सुरू होऊन, केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे.

ते पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिलेला आहे. तीन वेळा एका राज्याचे मुख्यमंत्री आणि सलग ११ वर्षे पंतप्रधान पद म्हणून अतिशय प्रभावी काम करत आहेत. पंतप्रधान पदाच्या काळात २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेतून बाहेर आली. आज आपल्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या क्रमांकाकडे झेप सुरु आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्य प्रगतीपथावर आहे. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिला आहे. ते जेव्हा मंडल सरचिटणीस होते, तेव्हा मी बूथचा युवा मोर्चा अध्यक्ष अध्यक्ष होतो. मंडल सरचिटणीस ते केंद्रीय मंत्री पर्यंत त्यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या. चंद्रकांतदादा पाटील यांनी ही विद्यार्थी परिषदेपासून ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असा प्रवास आहे. त्यामुळे आपण दोघांचाही आदर्श समोर ठेऊन काम केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उपाध्यक्ष  नितीन शिंदे, दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका वासंती जाधव अल्पना वरपे, छाया मारणे, हर्षाली माथवड, श्रद्धा प्रभुणे तसेच कोथरूड मध्य मंडळाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Img 20250629 wa00602344343109455081984

अशी आहे कोथरूड मतदार संघाच्या मध्य मंडलाची कार्यकारिणी

सरचिटणीस

  • सचिन मोकाटे,
  • अमित तोरडमल,

उपाध्यक्ष

  • संतोष अमराळे,
  • पल्लवी गाडगीळ, 
  • दत्ता भगत,
  • रणजीत हरपुडे,
  • बाळासाहेब दांडेकर,
  • संदीप कुंबरे,

कोषाध्यक्ष

  • आशुतोष वैशंपायन,

चिटणीस

  • सुरेखा जगताप,
  • सुजित मगर,
  • प्रीतम थोरवे,
  • प्रकाश काळोखे, 
  • अभिजीत मुळे, 
  • सुप्रिया माझीरे,

प्रभाग अध्यक्ष

  • प्रभाग क्र. १० अध्यक्ष प्रदीप जोरी,
  • प्रभाग क्र. ११ अध्यक्ष अतुल शिंदे,
  • प्रभाग क्र. १२ अध्यक्ष अंबादास अष्टेकर
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये