पुण्यात गणेशोत्सवात सेल्फी काढाल तर अडचणीत याल ; का ते जाणून घ्या..

पुणे : pune city कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गणपती मंडपात थांबून सेल्फी काढण्यास पुणे पोलिसांकडून( pune police) मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/PuneCityPolice/status/1438706901391314947?s=08
गणेशोत्सवानंतर कोरोनाची तिसरी लाट येईल असे बोलले जात आहे. सध्या गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस बाकी असल्याने शहरातील काही गणपती मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे. दर्शनासाठी आलेले काही भाविक बाप्पा बरोबर सेल्फी काढण्यासाठी तेथेच थांबून राहत असल्याने एकाच जागी गर्दी होताना दिसत आहे.
बाप्पा बरोबर सेल्फी काढण्यासाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते आणि म्हणूनच पुणे पोलिसांकडून गणेश मंडपात सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आल्याचे दिसत आहे. गणेश भक्तांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.




