पुणे शहर

वारजे माळवाडीतील बिबट्या जेरबंद : वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश

पुणे : आता शहराच्या उपनगरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुढे आले आहे. वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे येथील एका सुरू असलेल्या बंधकामाजवळ दिसलेला बिबट्या रेस्क्यू टीमने दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केला आहे.

वारजे माळवाडीतील न्यू अहिरे येथील एका सुरू असलेल्या बंधकामा जवळ सकाळी सातच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. साडेसात आठ वाजता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम वारजे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाली होती. बिबट्या दिसलेल्या ठिकाणी जाळी लावण्यात आली मात्र बिबट्याने तेथून पळ काढला होता.

आखेर न्यू अहिरे येथील महापालिकेच्या शेलार उद्यानामागील कडबा कुट्टीतील ऊसात लपून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन मारून बेशुद्ध करून पकडण्यात आले. बिबट्याला पकडण्यात आल्याने वारजेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रेस्क्यु ऑपरेशन चालू असताना बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दोन दिवसांपूर्वी, पुण्यात कोंढवे धावडे येथील एका
सोसायटीच्या आवारात बिबट्या दिसल्याने गोंधळ उडाला होता. तोच बिबट्या वारजे माळवाडी पर्यंत पोहचल्याचे बोलले जात होते. बिबट्या सापडल्याने नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

वारजेतील बिबट्याला जेरबंद केल्याचे exclusive videos
वारजेत सीसी टीव्हीत कैद झालेले बिबट्याचा व्हिडिओ
Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये