पुणे शहर

चांगल्या शिक्षकांमुळे समाजात सुसंस्कार टिकून आहेत.-अनुराधा ओक

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले  यांचा जन्म दिवस हा महिला शिक्षक दीन म्हणून  जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ९ बाणेर – बालेवाडी च्या वतीने प्रभागातील महिला शिक्षिकांचा सत्कार आलोमा काउंटी सोसायटी सभागृह ,बाणेर येथे एसएससी बोर्डाच्या विभागीय सचिव अनुराधा ओक यांचे हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना अनुराधा ओक म्हणाल्या की , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एक आदर्श स्त्री ,पत्नी आणि माता होत्या. सध्या कोविड – १९ मुळे डिजिटल टेक्नॉलॉजी चा वापर शिक्षणासाठी होत आहे परंतु शिक्षकांची जागा कोणतीही   डिजिटल टेक्नॉलॉजी घेवू शकत नाही .शिक्षकी पेशा हा व्रत म्हणून न स्वीकारता वसा म्हणून स्वीकारला पाहिजे ,वसा म्हणून स्वीकारल्यास तुमची नैतिक जबाबदारी येते.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

या प्रसंगी पुनम  विशाल विधाते, शुभांगी योगेश मुरकुटे,सुषमा ताम्हाणे ,अर्जुन शिंदे,  नितीन कळमकर अर्जुन ननावरे, जंगल    रणवरे, समीर  चांदेरे ,शेखर सायकर, प्रणव कळमकर    योगेश मुरकुटे , सुशील मुरकुटे, अक्षय विधाते, विक्रम विधाते, तुषार विधाते, रोहित विधाते  व इतर मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ९ च्या युवती अध्यक्ष कु प्राजक्ता ताम्हाणे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये