महाराष्ट्र

बैलगाडा शर्यती सुरू करण्याची केंद्र सरकारकडे खासदारांची मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी. या मागणीचे निवेदन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले .
    

Img 20200922 wa0013 2

पाटील म्हणाले, बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात त्यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

  महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकिन व मालक यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा, यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना यावेळी करण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये