पुणे शहर

सुषमा अंधारेंकडून संजय शिरसाटांविरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

पुणे : शिवाजीनगर न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांच्याविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना संजय शिरसाट यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज (२७ एप्रिल) संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

सुषमा अंधारेंवर टीका करत असताना संजय शिरसाट म्हणाले होते की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.”

सुषमा अंधारे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांना हे वक्तव्य भोवणार असं बोललं जात आहे.

Screenshot 2023 0427 133512172213840565051751

ही लढाई महिलांच्या सन्मानासाठी : अंधारे

न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, ही लढाई कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही तर केवळ महिलांच्या सन्मानासाठी आहे. महिलांबद्दल अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला चाप बसावा यासाठी ही लढाई आहे. राज्यातल्या लेकी-बाळींबद्दल, महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य आणि अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हा एकच उद्देश आहे.

काही दिवसांपूर्वी अंधारे यांना विचारण्यात आलं होतं की, तीन रुपयांचाच दावा का? त्यावर अंधारे म्हणाल्या होत्या,“मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. त्याचबरोबर अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. लाखो कोटी रुपयांमध्येही करता येत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभ नको. मी भटक्या विमुक्तमधून येते. आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान करणं हा सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून गुन्हेगाराला तीन रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते.”

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये