अर्थजगत
शेअर बाजारात आज ‘ब्लॅक फ्रायडे’? सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला

आज भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीतही 250 हून अधिक अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर, आशियाई शेअर बाजारात पडझड सुरू आहे. हँगसेंग निर्देशांक 4 टक्क्यांनी कोसळला आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 773.94 अंकानी म्हणजे जवळपास 1.39 टक्क्यांची घसरला. सेन्सेक्स आज 54,928.29 अंकावर सुरू झाला. सेन्सेक्स 55 हजार अंकाच्या खाली घसरला आहे.
निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याने शेअर दर घसरला आहे.




