पुण्यासारख्या रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कडक लॉकडाऊनचा विचार करावा : हायकोर्ट

मुंबई : पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा असं मतही नोंदवलं आहे.In places like Pune where the number of patients is high, the Chief Minister should consider lockdown: High Court

राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांसाठी निर्बंध अधिक कठोर करत थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोना रुग्ण संख्या फार जास्त आहेत तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असं उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं.



